''न खिंचो तलवार को,
न खिंचो तुमान को,
जब तोफ मुकाबिल हो,
अखबार निकालो"
अस म्हटलं जायचं, तेच अखबार म्हणजे वर्तमानपत्र जाऊन त्याची जागा आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाने घेतली आहे. मध्यंतरी न्यायालयाला सांगावं लागलं की, या देशात प्रति न्यायव्यवस्था चालवायची असेल तर देशात न्यायालय चालवायची गरज काय? बातमीसाठी काहीही करणाऱ्या आणि चोवीस तास रतीब देणाऱ्यांना याचं काही वाटत नाही. पत्रकारितेची नीतिमूल्ये खुंटीला टांगून ठेवून या समाजाची आणि देशाची व्यवस्था चालवायचा मक्ता घेतल्यासारखे सर्व माध्यम वागत आहेत.
एखाद्या माणसावर आरोप होण्याचा अवकाश, त्या माणसाची अब्रूची लक्तरे चॅनेलच्या वेशीवर टांगण्याची जणू शर्यत लागलेली असते. तो माणूस काय आहे आणि त्याला जणू गुन्हेगार ठरवून आता फाशीची शिक्षा देण्यात यावी इथपर्यंत जर मजल जात असेल तर या देशात न्यायालयाची गरज नाहीच. सध्या एखाद्या प्रश्नावर किती मत मांडावी आणि त्याचे काय परिणाम होतील याचा विचार ना संपादकाला असतो ना अँकरला, स्वतःच म्हणणं खरं करण्यासाठी समोरच्या माणसाला बोलू न देणे. एवढंच काय पण आपण कसे खरे आणि आपली पत्रकारिता कशी खरी याचा विचार कोणाकडेच कसा नसावा हे या समाजाचं दुर्दैव आहे. TRP ची जीवघेणी स्पर्धा माणुसकी संपवते हे समोर येतंय.
एखाद्याला नागडं करण्यासाठी स्वतःच्या नागडेपणाचा विचार पत्रकारांकडे नाहीच. पण जे चांगली तत्त्वनिष्ठ पत्रकारिता करत आहेत त्यांना यामुळे बदनाम व्हावं लागतं हे दुर्दैवी आहे. एखाद्याच्या तोंडाला काळ फासण्यासाठी स्वतःचे हात काळे झाले तरी चालतील हा प्रवाह आज पत्रकारितेत आला आहे.
रुस्तुम नावाच्या चित्रपटात एखादी बातमी, आणि लेखमालिका निकाल व्यवस्थेवर कसा प्रभाव पाडू शकते याचं उत्तम उदाहरण
दिसून येते. 26/11 चा हल्ला असू द्या, उरी पाठणकोटचा हल्ला असू द्याकी, पी. व्ही. सिंधू फायनल मध्ये पोहचून सुवर्णपदक जिंकणार म्हणून केलेला उन्माद असू द्या, यातून पत्रकारितेची अपरिपकवता दिसून येते. अगदी बालिशपनाचे प्रकार काही चॅनेल वरती होतात हे श्रीदेवी मृत्यूच्या वेळी आपण पाहिलं आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजय मल्ल्या सारखा टिनपाट माणूस सुद्धा भारतीय मीडियावर आरोप करतो की मला मीडियाने खलनायक बनवलं. राहुल गांधींची पप्पू म्हणून उभा राहिलेली प्रतिमा असू द्या, की मोदींची फेकू म्हणून केलेली प्रतिमा यात मीडियाचा सर्वात मोठा हातभार दिसून येतो.
ब्रेकिंग न्यूज साठी व्यवस्था ब्रेक करणारांनी, बातमीतली बात जर समजून घेतली तर समाज प्रगल्भ झाल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रात बाळशास्त्री, आगरकर अत्रे ते नव्या पिढितल्या विलास बडे, नामदेव अंजना पर्यंतच्या पत्रकारांनी पत्रकारितेचा आणि प्रबोधनाचा वारसा जपला आहे. तो जपण्याची गरज आहे.
गावातल्या लोकांना तैमुरने शी केली, डोळा मारला, तो झोपला या बातमीशी काही देणंघेणं नसतं. पण ते दाखवून स्वतःची इज्जत घालवून घेण्याचा प्रकार घडतोच. कोणत्याही व्यवस्थेत माणसं असतात, ती व्यवस्था माणसं चालवतात, म्हणून माणसांनी त्याच गुलाम होऊ नये. व्यवस्थेला खतपाणी घालण्यात आजचे पत्रकार आणि पत्रकारिता त्याची गुलाम झाली आहे. " द वॉली '' नावाच्या चित्रपटात यंत्राचा गुलाम झालेला माणूस सरतेशेवटी जागा होतो. त्याला स्वतःच्या ताकदीची जाणीव होते. तसं आजच्या पत्रकारांना ही व्यवस्था, हा समाज, हा देश वाचवण्याची आणि टिकवून ठेवण्याची गरज आहे.
सदर ब्लॉगवर मांडलेली मत ही माझी वैयक्तिक असून, त्यामध्ये कोणाला त्रास देण्याचा, टिका करण्याचा कोणताही हेतू नाही. जर तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या ब्लॉगवर व्यक्त केलेली मतं ही माझी असून ती कोणीही स्वतःची मत म्हणून कॉपी पेस्ट करु नयेत
Sunday, 7 October 2018
माध्यमांना वेसण घालयालाच हवी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment