Monday, 22 April 2019

माढ्यात मतदान नेमकं कोणाला - पक्ष, व्यक्ती की पाण्याला

लोकसभेच्या निवडणुकांचा जोर आणि तापमानाचा ज्वर निसर्गावर चढत असताना अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील आहे, सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाकडे. 2009 साली या मतदारसंघाची नव्याने स्थापना झाली, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनी सुरुवातीला बॅटिंग घेऊन या मतदारसंघात दमदार सुरुवात केली. 2014 मध्ये मात्र शोएब अख्तरच्या स्पीडची मोदी लाट देशात वाहत असताना, पवार साहेबांनी बॅक तो पॅव्हेलीयन करत नवीन बॅट्समन मैदानात उतरवला. सोलापूर जिल्ह्याची द वॉल म्हणून ओळखले जाणारे, संयमी विजयसिंह मोहिते पाटील यांनी नेटाने किल्ला लढवत विजय संपादित केला. माढा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ही ओळख तयार केली. पण निसर्गाचा नियम आहे, ज्यांच्या शेतातून रस्ता जातो त्यांची चारचाकी त्या हायवे वरून कधीच जात नाही. मोदीलाटेच्या काळात पक्षाच्या तंबूचे दोर ज्यांनी भक्कम बांधले, त्या मोहिते पाटील कुटुंबालाचं तंबूच्या बाहेर काढण्याचं काम पक्षातील दादानिष्ठ गटाने करायला सुरुवात केली.
हे सगळं जेष्ठ पवारांना दिसत असावं, ऐकू येत असावं, पण जाणीवपूर्वक त्यावर बोलण्याचं त्यांनी टाळलं. सत्तेचा उन्माद 2014 साली जनतेने उतरवला तरीपण, वादळात पक्ष ज्यांनी सांभाळला त्यांची अवहेलना थांबली न्हवती. निष्ठावंत लोकांची जागा, हलक्या तोंडाच्या आणि चमचा लोकांनी घेतली. ज्यांनी घर उभा केलं त्यांना बाहेर करण्याची प्रोसेस सुरू होती आणि याला मुकसंमती कदाचित पक्षाचे सर्वेसर्वा पवार साहेबांची असावी.
2019 ची निवडणूक म्हणजे पक्षात माजलेला वेबनाब यातून निवडणूक लढवायची कोणी? हा प्रश्न उभा राहिला. हवेचा झोत ओळखुन पवार साहेबानी माघार घेतली.
आता रंग चढतोय तो निवडणूक जिंकणार कोण? 2009 ला माढा आणि शरद पवारांना पाडा अस स्व. गोपीनाथराव मुंढे म्हणाले होते. आता लोक माढा आणि राष्ट्रवादीला पाढा अस म्हणताहेत. हे वातावरण का झालं? जिथं पक्षापेक्षा व्यक्ती बघून मतदान व्हायचं तिथं पक्षाला तिलांजली का मिळतेय. राष्ट्रीय राजकारणात शेजारचा असणारा मतदारसंघ हातातून जाताना दिसतोय आणि यावर सगळे गप्प बसून आहेत. याच्या पाठीमागे गेल्या 10 वर्षात पक्षातील नको त्या लोकांनी नको ते वागणं आहेच पण माढ्याच्या राजकारणाला पाण्याचा वास आहे. 2012 -13 सालच्या दुष्काळात पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याऐवजी उजनी धरणातील पाणी अजितनिष्ठ उमेदवाराच्या दारू कारखान्याला 40 TMC पाणी बोगद्यामार्गे पळवले गेले. पण शेतकऱ्यांना देताना मात्र अश्लील भाषा केली गेली. दारूच्या कारखान्याला शेतीचं आणि भीमा नदीच्या काठच्या लोकांचं हक्काचे पाणी नेणारा उमेदवार आज समोर आहे. दुसरा फलटणचा उमेदवार पण तेच सांगतोय की त्यांच्या हक्काचं निरेच पाणी बारामतीला पळवले जातेय. याचा अर्थ स्पष्ट आहे सत्तेचा वापर बारामतीला हिरवं करण्यासाठी होतोय, पण बाकीच्या लोकांची मती नष्ट झाली पाहिजे असा प्रयत्न होतोय. त्यामुळं लोकांचं पण नक्की ठरलंय, अजितनिष्ठ उमेदवाराला जर निवडून दिलं तर उजनीच हक्काचं पाणी दारू कारखान्याला भीमा सीना बोगद्यातून जाईल आणि निरेच पाणी फलटण ओलांडून वेगाने बारामतीला जाईल. पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याऐवजी जेवढं ओंजळभर पाणी दुसरा उमेदवार निवडून देऊन येत असेल तर लोक नक्की याचा विचार करतील.
शेवटी माढ्याची निवडणूक ही शरद पवार साहेबांच्या नावपेक्षा, राष्ट्रवादी पक्षापेक्षा आणि कोणत्या इतर व्यक्तीपेक्षा पाण्याच्या मूलभूत प्रश्नावर होणार हे नक्की

No comments:

Post a Comment