मग कोणाचीतरी करुणा, गोड शब्दांनी मारलेला मस्का वगैरे उपायांनी साहेबांचा लोण्याचा गोळा होतो. बाकी आमच्या भेटीनंतर त्याच अनुभवायला आलेलं जमदग्नी रूप म्हणजे नवा साक्षात्कार होता. तसा माणूस प्रेमाचा, समंजस आहेच. नवीन वाचन, लेखन आणि बोलणं या सगळ्यातून अजूनही स्वतःला घडवत आहे. खरं सांगू दोस्ता, संपादक कधी पॅनिक नसतो. कोणत्याही कृतीला दुसरी बाजू असते ती बाजू बघितली तरीही लगेच मत तयार करायचं नसतं. कभी कभी खामोशी भी डर पैदा कर देती है, तसं काहीतरी शिक. जिंदगीत उभा रहायचं म्हटलं की काहीतरी हरवावं लागतं, ते हरल्याशिवाय आपल्याला आपली किंमत कळत नाही. पटवरच्या सगळ्याचं सोंगट्यानी प्रत्येक वेळी 6 चं दान दिलं म्हणून आपण जिंकू असं नसतं. काहीवेळा 1 हे दान पण महत्वाचे ठरतं. ते एक घ्यायला नाही पाडायला शिक बघ मग मज्जा किती येते.
आयुष्यात खूप मोठी मजल आणि प्रवास केला आहेस हे मान्य पण तुझी नजर आज जिथं काम करतो तिथलं तुझं टॉपचं करायचं आहे हा विचार कर. दोन क्षण रागाला बाजूला ठेवता आल तर बरं होईल. तुझा राग कमी होऊन तुझी प्रगती व्हावी याचं तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment