जुने लोक व्यवस्था चालवतात तेव्हा नव्याने काही बोलायचं नसत, आमचं नेमकं तसंच झालं आमच्या अगोदरच्या सीनियर लोकांनी आम्हाला घडवताना आमच्यावरती असे काही प्रसंग किंवा असे काही पराक्रम केले होते की ज्यातून आम्ही एक नवा धडा शिकलो होतो. रेल्वेच्या डब्यात प्रवेश करताना त्या डब्यात गर्दी आहे म्हणून बाहेरचा माणूस आत येऊ न देणारे बाकी प्रवासी, एखादा माणूस ती गर्दी तोडून डब्यात पोहोचला की बाहेरचा आत येऊ नये म्हणून जसा प्रयत्न करतो, तसंच नेमकं चाललं होतं दरवर्षी कमवा आणि शिका या योजनेमध्ये नवीन विद्यार्थी घेतले जायचे, हे नवीन विद्यार्थी आले की त्यांना सुरुवातीला अशीच जड कामे दिली जायची जायची ज्यामध्ये नाईट ड्युटी आणि बागकाम ठरलेल असायचा.
आमच्यापैकी मी विलास शिंदे आणि संजय मुळे हे तिघे जण नाईट ड्युटी एक्सपर्ट म्हणून ओळखले जायचे आम्हाला काढून जर एखाद्या नव्या मुलाला नाईट ड्युटी दिली तर तो मुलगा रूम मध्ये आल्यानंतर कॉलेजच्या एरियातील भुताची यादी आम्ही सादर करायचं भुताला घाबरलेले पोरगं दोन-तीन दिवसात पळ काढायचा आणि त्या ठिकाणी आमच्यापैकी कोणाचीतरी पुन्हा एकदा ड्युटी लावली जाईल आम्ही ड्युटी प्रामाणिकपणे करत होतो पण ते करत असताना आम्ही खूप पराक्रम करायचो. कॉलेजच्या पोर्चमध्ये नाईट ड्युटी करायची आणि त्यावेळी छत्रपती प्रवेशद्वारा मध्ये बेल वाजवायला जायचं, त्याच्या पूर्वी मात्र कॉलेजची इलेक्ट्रिक बेल वाजवायची आणि जाग रहायचं असं होतं मात्र आम्ही बेल ऑटोमॅटिक करून टाकली होती, ही जी दर तासाला आपोआप वाजायची. त्यामुळे बेल वाजवायचा त्रास वाचायचा.
एक दिवस संजू मुळे ड्युटी वरती होता कॉलेजचे प्राचार्य जे. जी. जाधव हे रात्रीच्या वेळी अचानक बाहेर आले त्यांनी पाहिलं बेल वाजते आहे, पण ड्युटीवरचा मुलगा कुठे दिसत नाही पोर्चमध्ये येऊन त्यांनी बघितलं तर संजु निवांत झोपी गेला होता आणि बेल वाजत होती त्यानंतर मात्र त्यांनी इलेक्ट्रिक बेल च्या ऐवजी पितळेचा घंटा वाजवायचा असं सांगितलं. ही सगळी काम करून आम्ही दिवसा कॉलेज पण करायचो.
आमच्या रूम मध्ये असणारे काही मित्र म्हणजेच आम्ही सगळे कमवा शिकायचे वारकरी यामध्ये उत्तरेश्वर पाटील हा होमगार्ड म्हणून काम करायचा घरची परिस्थिती खूप गरिबीची आई आणि वडील गावाकडे खूप कष्ट करायची, आजी आपल्या नातवाने काहीतरी मोठं बनावं याच्यासाठी त्याला बरच काही बोलायची मात्र घरच्या गरिबीचा आणि परिस्थितीचा राग डोक्यात असणाऱ्या उत्तरेश्वर म्हणजेच पप्पू पाटील, याला तिचापण खुप राग यायचा. शिकत शिकत पीएसआय बनण्याचे स्वप्न पाहणारा उत्तरेश्वरने स्वतःच्या पेटीवरती पण लिहून ठेवलं होतं पीएसआय पप्पू पाटील.
अनिल केदार माढयासारख्या दुष्काळी भागातून आलेला, महात्मा गांधींच्या सत्यवचनी प्रयोगा वरती काम करणारा हा गांधीवादी कार्यकर्ता असावा, कारण बारावीला खूप मार्क पडूनही केवळ एका मार्कने डि. एडला नंबर न लागलेला हा केदार, कर्मवीरांच्या जीवनावरती आणि त्यांच्या विचारांवरती प्रचंड निष्ठा ठेवून होता ड्युटी मध्ये चुकारपणा करणाऱ्या पोरांना तो नेहमी म्हणायचा अण्णा वरून बघत आहेत आणि त्यांच्या काठीचा एक फटका तुझ्या डोक्यामध्ये निश्चित पडेल.
दोन मोरे बंधू म्हणजेच मारुती मोरे आणि बजरंग मोरे यातील मारुती मोरे याला स्वतःच्या ताकतीचा अंदाज अगोदर पासून असल्याने तो रामायणातल्या मारुती पेक्षा पण सुरुवातीपासूनच जहाल होता. आपली ड्युटी व्यतिरिक्त आपण कोणतेच काम करणार नाही असं तो कोणत्याही सेक्रेटरीला ठणकावून सांगायचा, जे काम मी करतोय त्याव्यतिरिक्त जर कुणी मला काम सांगितलं तर मी ते काम करणार नाही, असा टिळकांचा बाणा मारुतीच्या रक्तात भिनलेला होता. रविवारच्या एका श्रमदानात सेक्रेटरी असणाऱ्या एका मुलाने मुलींच्या समोर शायनींग मारण्यासाठी चार कडक शब्द मारुतीला सुनावले. आणि मारुतीने त्याची इज्जत उतरवताना काहीही न बोलता त्याच्या गालावरती दोन वाजून, आणि उचलून फेकून देऊन घालून दाखवली. दुसरे पात्र म्हणजे बजरंग मोरे अकरावीला सगळ्याच विषयात पस्तीस मार्क घेऊन पास झालेला बजरंग अर्थात बज्या हे कमवा शिकाचं आणि कॉलेज ओळखीचे पात्र पिठाच्या गिरणीत सलग पाच वर्षे ड्युटी करण्याचा त्याचा आणि संजू मुळेचा रेकॉर्ड आजतागायत कोणी मोडू शकले नाही. बजरंग आर्या हा पिक्चर बघून आर्या जसा बोटावरती वही फिरवतो तसा वही, पुस्तक, जेवणाचे ताट फिरवायचा, त्याचे एवढे प्रचंड व्यसन त्याला लागलं होतं त्याच्या हातावरती काहीही आलं तर तो फिरवायला लागायचा. आम्ही सगळे म्हणायचो बज्या साल्या वही फिरवु नको जिंदगी फिरेल. असा हा बजरंग वही फिरवत ठेवत मोठा झाला. शिवाजी विद्यापीठात असताना एम ए झाल्यानंतर लगेच सेट परीक्षा पास होऊन पण रिझल्ट न बघितल्या कारणाने तब्बल तीन वर्षानंतर त्याला कळलं की आपण सेट पास झालो. प्रचंड आळशी असणारा वेळेच, काळाचे कशाचंच भान न ठेवणारा बजरंग आज दहिवडी कॉलेज दहिवडी याठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करतो.
याच काळातला आमचा सुरुवातीचा सेक्रेटरी म्हणून काम करणारा बंडू बागल हे एक अवली पात्र आम्ही सगळे बागल च्या ऐवजी त्याला पागल म्हणायचो. कॉलेजमध्ये कोणतं फूल सुंदर आहे आणि त्या सुंदर फुलावरती फुलपाखरू म्हणून बसण्याचा त्याचा अट्टाहास सगळ्याला चकित करून जायचा. आयुष्यात अनेक वळण अनेक वाटा असलेला हा माणूस शेवटी सिक्युरिटी ऑफिसर म्हणून स्थिरस्थावर झाला. मला एका गोष्टीचे प्रचंड आश्चर्य वाटायचं 100 पर्यंत अंक मोजता येणारा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी कोणतीच गोष्ट त्याला जमत नसताना आयुष्याचं गणित मात्र त्यांना सुंदरपणे सोडवल.
विलास शिंदे अर्थात सगळ्या कॉलेजचा बुवा. बुवा शिंदे हा खूप कष्टाळू माणूस स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं या जिद्दीने अतोनात कष्ट करायचा सुरुवातीच्या काळात लेडीज होस्टेल चा मार्केटर अर्थात भाजीपाला पुरवणारा म्हणून त्यांना काम केलं काम केलं नंतर अभ्यासिका आणि इतर ठिकाणी त्याने काम केलं. मी त्याला म्हणायचो, "वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया" पण हा बुवा मात्र बाया पासून दूर होताच, परीक्षेत यश मिळवून तो जेल पोलीस झाला. बापू जाधव हा मंगळवेढा तालुक्यातल्या नंदेश्वर भोसे या गावचा अतिशय शांत, समजूतदार, सोजवळ, असणारा हा माणूस. कमवा शिका मध्ये या माणसाशी आमच्यापैकी कधीच कुणी भांडलं नसावं. प्रेमळ बापू कष्टाळू होताच पण जबाबदार पण होता. कर्जाने गांजलेल्या वडिलांनी आत्महत्या केली, तरीपण त्याचं कोणताच भांडवल न करता पाठीचा कणा ताठ ठेवून हा माणूस परिस्थितीला हरवण्यासाठी लढत राहिला. आज पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून तो काम करतो.
सोमनाथ आदमिले रोपळे गावचा सुपुत्र चार भावातलं आदमीले घरण्यातलं हे शेंडेफळ अपत्य दहावीच्या वर्गात चांगले मार्क मिळाल्यानंतर घरची परिस्थिती नसल्यामुळे सायन्सला जाता येत नाही म्हणून आर्टसला ऍडमिशन घेऊन मला फक्त जिंकायच आहे, एवढं ध्येय समोर ठेवून, झेरॉक्स मशीन, एसटीडी, स्टोअर या सगळ्यांचा पुरेपूर अनुभव घेऊन सरतेशेवटी सोमा गोकुळात स्थिरवला. गोकुळ म्हणजेच "मुलींचं होस्टेल" चेष्टेत मी त्याला नेहमी गोकुळातला कान्हा म्हणायचो. हा गोकुळातला कान्हा प्रत्यक्षात मात्र सगळ्या गवळणीचा सोमाभैया होता. जर जास्त अन्याय कुणावर झाला तर याचे उत्तर मात्र या माणसाचं नाव नक्कीच घेईन. हा गमतीचा भाग सोडला तर एक प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी सोमा पुण्यामध्ये राहून प्रयत्न करतो त्याच्या प्रयत्नाला यश नक्कीच मिळेल.
परिस्थितीनं शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून फक्त मुलंच कष्ट करत होती असं नाही मुलांच्या जोडीला आम्हाला सख्या भावाप्रमाणे प्रेम लावणाऱ्या बहिणीपण इथेच भेटल्या यातलं नाव म्हणजे वैशाली गायकवाड - मोरे सध्या महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या चळवळीमध्ये काम करते आहे. 1993 ला किल्लारीचा भूकंप झाल्यानंतर गाव सोडून चळे या गावात स्थलांतरित झालेले कुटुंब व त्या कुटुंबातील ही मुलगी कमवा शिकामध्ये काम करताना एनएसएसच्या माध्यमातून उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणुन पुढे आली.आमच्या सगळ्यां वरती एक बहीण म्हणून आजही तिचा आदरयुक्त धाक आहे. काळ्या म्हणून मारलेली हाक आणि तुझ्यासारखं खडूस भाऊ मिळायला भाग्य लागतं हा तिचा डायलॉग आजही तेवढ्याच खणखणीतपणे आठवतो. सुनिताताई इ पिल्लू
पिलीव जवळच्या बचेरी गावातून आलेली ही मुलगी एक खेळाडू होतीच पण कमवा आणि शिका या योजनेच्या सर्व मुली सगळ्यांशी प्रेमाने वागणारी ही मुलगी आजही आठवते. क्षितिजा देशमुख म्हणजे आमची दिदु. कमवा शिकत असताना, "दादा तू, कॉलेजच्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ नको, म्हणजे मला बक्षीस मिळेल आणि तु जे बोलणार आहे ते मुद्दे मला देऊन टाक म्हणजे माझं भाषण चांगलं होईल, असं म्हणून हक्काने भांडणारी आणि आमच्या सगळ्यात भावान वरती जीव लावणारी दिदु आज आष्ट्या मधल्या लोखंडे घराण्याची सुन आहे. अर्चना भोसले सध्याची मोरे कमवा शिका ची मुलींची सेक्रेटरी हिने बी. एड नंतर शिवाजी विद्यापीठ मध्ये एम ए केले. माणसाने किती व्यवहारिक असावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्चना भोसले. आळशी आणि प्रचंड अभ्यासू असणाऱ्या बजरंग ला प्रेमाच्या जाळ्यात फोडून त्याच्याशी लग्न करणारी अर्चना उत्कृष्ट गृहिणी उत्तम जोडीदार आहे.
आम्ही सगळे दहा वर्षानंतर कोणत्या, कोणत्या कुठेतरी खूप मोठ्या वळणावरती येऊन पोहोचलो आहोत. एकमेकाच्या संपर्कात असणारे ही सगळी नावं माझ्यासमोर आहेत, आम्ही एकमेकांशी बोलतो अधेमध्ये भेट होते, सुख दुःख शेअर करता येतात. पण त्या काळात आमच्या बरोबर असणारे आमचेच काही मित्र आज आमच्यापासून हरवले आहेत त्यांची नावे लक्षात आहेत, चेहरे लक्षात आहेत. त्यांची आठवण तर आहेच, पण सगळ्या प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या या माणसांना काळाच्या ओघात समोर आले तर मी ओळखू शकेल? कदाचित नाही सगळ्याच प्रश्नांची उत्तरं, ही हो म्हणून येतात असे नाही काही उत्तरं नकारार्थी पण असू शकतात. नकाराच दुःख एका बाजूला ठेवलं तर आम्ही सर्वजण खुश आहोत. पेला अर्धा रिकामा आहे म्हणून मी दुःख करत नाही पेला अर्धा भरलेला आहे म्हणून आम्ही सुखी आहे. मित्रांनो कॉलेजच्या आठवणी येतील हे काही भारलेले क्षण. ज्यांना मनाच्या फलकावरून पुसता येण कधीच शक्य नाही. याच्यासाठी कोणता खोदरबर किंवा डस्टर पण वापरता येणार नाही, म्हणूनच हे कोरून ठेवलेले क्षण पुन्हा एकदा सर्वांसाठी
No comments:
Post a Comment